कृष्णात्परं किमपि तत्त्वम्

राम आणि कृष्ण  ह्या दोघांचाही भारतीय जनमानसावर अफाट प्रभाव आहे. चैत्र शुध्द नवमीला रामनवमी आणि श्रावण वद्य अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी कुठल्या वारी आहेत हे माहित करून घेण्यासाठी कॅलेंडर पाहावे लागत नाही. रामाला देवत्व बहाल केल्यामुळे कदाचित्‌ त्याच्या मानवी जीवनाचा तपशील शोधण्याचा प्रयत्न  झाला नसावा. राम जेव्हा सिंहसनाधिष्ठित राजा झाला तेव्हा राज्याची व्यवस्था लावण्याचा भाग म्हणून …

लोकशाहीची कहाणी

संसद, सर्वोच्च न्यायालय, निर्वाचन आयोग,राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ ह्या पाची संस्थात व्यवस्थित समन्वय असेल तर ती खरीखुरी लोकशाही; अन्यथा तकलादू  लोकशाही. कचकड्याच्या खेळण्यातली लोकशाही असे म्हणायलाही हरकत नाही. राज्यांच्या बाबतीतही लोकशाहीच्या ह्या पाची संस्थांचे समन्वय अपेक्षित आहे. फक्त संसदऐवजी, विधिमंडळ, उच्च न्यायालय, राज्याचे निर्वाचन आयुक्त आणि राज्याचे मंत्रिमंडळ असा फरक केला की लोकशाही संस्थांचे हे समन्वय …

इडी-बिडी

इडी, सीबीआय आणि एनएसए ह्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या देशातल्या मोठ्या तपासयंत्रणा! सर्वसामान्यपणे सरकारी अधिका-यांशी वा राष्ट्रीयीकृत बँकांशी संगनमत करून हवाला रॅकेट ह्यासारख्या आर्थिक गैरव्यवहारातून मिळवलेला बेहिशेबी पैसा त्यांच्या घशातून बाहेर काढतात.  संशयितांच्या घरातील   नोटांची पुडकी, सोनेनाणे आणि वाटेल ती स्थावरमालमत्ता जप्त करण्याचा अधिकार एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला आहे. एकेकाळी आर्थिक गुन्ह्याला गुन्हा न मानण्याचा संकेत होता. ह्याचे …