बुडित कर्जांचे निर्लेखन!

केंद्र सरकारच्या मित्रांची कर्जे सरकारी बँकांनी माफ केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहूल गांधींनी केला. त्यांचा आरोपाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन् आणि माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांनी कडक समाचार घेतला. त्यांच्या खुलाशामुळे सकृतदर्शनी तरी राहूल गांधींना मुहतोड जबाब मिळाला ह्यात शंका नाही. पण एवढी मोठी रक्कम बॅंकांच्या नफातोटा पत्रकातून का काढून टाकावी लागते ह्याचा …

महाभारतातले राजकारण -२

कौरवांच्या दरबारात झालेल्या सर्वस्वान्तकारक द्युतात द्यूतविषयक सारे संकेत पायदळी तुडवले गेले होते हे आपण ‘महाभारतातले राजकारण-१’ ह्या लेखात पाहिले. द्युतात हरल्यावर पांडवांना १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. वेष आणि नाव बदलून पांडवांनी मत्स्य देशाच्या राजदरबारात अज्ञातवासाचे एक वर्ष काढले. भीम-अर्जुन ह्यांच्या मनात सरळ हस्तिनापूरशी युध्द करून दुर्योधनादि अन्यायी कौरवांना ठार मारायचे …

कोरोना चिंता

महाराष्ट्रात झालेली कोरोना रूग्णांच्या संख्येतली वाढ चिंताजनक आहे. रविवारी राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या ८०६८ वर गेली तर कोरोना मृत्यूचा आकडा ३४२ वर गेला. धारावीतच रूग्णांची आणि बळींची संख्या वाढल्याने राज्यातील आणि मुंबईतील रूग्ण तसेच बळींची संख्या वाढणे स्वाभाविक आहे. अर्थात रूग्णांवर उपचार केल्यानंतर बरे झालेल्यांच्या  संख्येतही वाढ झाली आहे. आकडेवारीबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त करण्याचे …