‘मेरा भारत महान’ ही घोषणा खोटी नाही. नव्याने बांधण्यात आलेल्या संसदेत भगवी वस्त्रे ल्यालेल्या गोसाव्यांच्या उपस्थितीत राजदंड स्थापित करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला बहुसंख्य लोकप्रतिनिधी मात्र अनुपस्थितीत होते. अर्थात स्वत:ला फकीर म्हणून घोषित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला आणि त्यांनी निवडलेले मान्यवर उपस्थित होते. विरोधी खासदारांनी स्वत:हून कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला असल्यामुळे त्यांचा उपस्थितीचा …
Author Archives: रमेश झवर
काँग्रेसला विक्रमी यश
कर्नाटकात १९८९ पासून झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला काँग्रेला मिळालेल्या यशासारखे भरघोस यश मिळाले नव्हते. ह्या निकालाचे महत्त्व केवळ कर्नाटकपुरतेच आहे असे नव्हे. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा आघाडीचे सरकार अधिकारारूढ झाल्यापासून झालेल्या निवडणुकीच्या इतिहासातही ह्या निकालाचे महत्त्व राहील असे निर्विवादपणे म्हणावेसे वाटते. विशेषत: राहूल गांधींना ‘पप्पू’ संबोधून मोदींनी त्याची यथेच्छ खिल्ली उडवली होती. श्रोत्यांच्या …
निकालाचा अन्वयार्थ
विधानसभा किंवा लोकसभाध्यक्षाच्या अध्यक्षाने दिलेले रूलिंग अंतिम स्वरपाचे मानले पाहिजे. त्याला न्यायालयात आव्हान देणे म्हणजे लोकशाही तत्त्वांशी फारकत ठरेल! -शेषराव वानखेडे, दिवंगत भूतपूर्व विधानसभाध्यक्ष गुरूवार, दिनांक ११ मे २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा तपशील पाहिल्यावर शेषराव वानखेडे ह्यांनी देशव्यापी वैधानिक पदाधिका-यांच्या बैठकीत नमूद केलेले नमूद केलेले मतच स्पष्ट करणारे आहे. राजाकारणात बदललेल्या पिढीला हे …