महिला आरक्षणाचा जुमला

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी एकतृतियांश मतदारसंघ राखून ठेवण्याची तरतूद करणारे विधेयक लोकसभेत ४५४ विरूध्द २ मतांनी संमत झाले. ओवायसीच्या २ खासदारांनी ह्या ठरावाविरूद्ध मतदान केले. मतदारसंघाची पुरर्चना केल्याखेरीज ह्या ठरावाची अमलबजावणी करता येणे शक्य होणार  नाही हे स्पष्ट करण्याचे सरकारने टाळले. महिलांसाठी राखीव मतदारसंघ कोणते हे ठरवण्यासाठी प्रथम जनगणना होणे आवश्यक आहे. कोरानाच्या कारणामुळे …

महाराष्ट्र पूर्वीचा आणि आजचा

सहज  कुतूहल  म्हणून केतकरांच्या ज्ञानकोश चाळला. महाभारतातील भीष्म पर्वात तत्कालीन भारतातील वेगवेगळ्या राजांच्या राज्यांची नावे आली आहेत. त्यात विदर्भ हे नाव आहे, परंतु महाराष्ट्राचे नाव नाही. दक्षिणेतील ही सारी  राज्ये पयोष्णी म्हणजेच नर्मदा नदीच्या दक्षिणेला आहेत. सौराष्ट्र आणि आनर्त ( सध्याचे गुजरात )च्या पलीकडे वसलेल्या भूभागाला  अपरान्त आणि परान्त अशी नावे होती.  ही दोन्ही नावे …