अर्थसंकल्पाचा  भोवरा

दि. १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशासाठी आहे की ह्या वर्षभरात होणा-या राज्यांसाठी असा प्रश्न संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ ह्यांनी २०२३-२०२४ वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर केला तेव्हा देशातील जनतेला पडला असेल!ह्या वर्षी अनेक राज्यात होणा-या विधानसभा निवडणुका जिंकायच्या तर त्या राज्यातील सरकारांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे ह्याचे भान अर्थमंत्री निर्मला …

रोग जुनाच, औषधही तेच

नव्याने जाहीर  झालेल्या जीएसटी करात सरकारने वाढ केली आहे.  केंद्र  सरकारच्या हावरटपणाला सीमा राहिली नाही हेच खरे! आले निर्मलाजींच्या मना, तेथे अधिका-यांचे चालेना ! अर्थसंकल्पाव्यतिरिक्त अन्य वेळी करवाढ करण्याचा केंद्राला जडलेला रोग तसा जुनाच आहे. तो काँग्रेसच्या काळातही होता. भाजपाच्या काळात तो रोग गेलेला नाही. ह्याचा साधा अर्थ असा की नियोजनबाह्य खर्चाला घालणे सरकारला शक्य …

पुन्हा व्याज दरवाढीचा प्रवास

गेल्या १७ महिन्यांपासून  सतत वाढत जाणारा किरकोळ महागाई निर्देशांक आणि गेल्या ४ महिन्यांपासून वाढत जाणारा  घाऊक महागाई निर्देशांक रोखण्यासाठी शेवटी रिझर्व्ह बँकेला व्याज दर कपातीचे सत्र आवरते घ्यावे लागले. अमेरिकेसह  जगभरातील अनेक देशांनी बँक दर कपातीचे पाऊल उचलल्यानंतर दरवाढ करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेला निर्णय घेणे भाग पडले. रिझर्व्ह बँकेने व्याजाचे दर ४० आणि ५० टक्के …